‘कविता’ प्रत्यक्ष कृतीत उतरवता उतरवता खरी ‘कविता’ आयुष्यातून कधी गमावली, याचा मलाच पत्ता लागला नाही!
ती इतक्या शांतपणे निघून गेली, यावर आजही विश्वास बसत नाही. तिनं जाऊन आज वर्ष झालं. या वर्षभरात मी काहीही नवीन लिहू शकलो नाही. एक कविता शब्दांत उतरवता आलेली नाही. अखेरचं जिद्द करून भेटायला यायला पाहिजे होतं, मी ते केलं नाही. ठरवलं असतं तर शक्य झालं असतं, पण मी चुकलो. ही चूक आयुष्यभर मनाला खात राहील. त्यातून आता माझी सुटका नाही.......